अहमदाबाद : IPL 2021 हंगामातील 26 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध झाला. या सामन्यात पंजाब किंग्सने 34 धावांनी विजय मिळवला.
बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 180 धावा करत बेंगलोरला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला 20 षटकात 8 बाद 145 धावा करता आल्या.
पंजाबने दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बेंगलोरकडून कर्णधार विराट कोहलीसह देवदत्त पडीक्कलने डावाची सुरुवात केली. मात्र, पडीक्कल केवळ 7 धावा करुन तिसऱ्या षटकात रेली मेरीडीथच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर रजत पाटिदारने विराटला चांगली साथ दिली. या दोघांनी 43 धावांची भागीदारी केली.
ही भागीदारी रंगत असतानाच हरप्रीत ब्रारने 11 व्या षटकात पहिल्याच चेंडूवर विराटला 35 धावांवर त्रिफळाचीत केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर त्याने ग्लेन मॅक्सवेलला शुन्यावर त्रिफळाचीत केले. तर 13 व्या षटकात त्याने धोकादायक एबी डिविलियर्सचा अडथळाही दूर केला. डिविलियर्स 3 धावांवर बाद झाला.
रजत आणि शाहबाजने बेंगलोरचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, 15 व्या षटकात ख्रिस जॉर्डनने रजतला बाद केले. रजत पाटीदार 31 धावा केल्या. त्यानंतर लगेचच 16 व्या षटकात लागोपाठच्या चेंडूंवर शाहबाज आणि डॅनिएल सॅम्स हे दोघे रवी बिश्नोईविरुद्ध खेळताना बाद झाले. शाहबाजने 8 धावा केल्या. तर सॅम्सने 3 धावा केल्या.
दरम्यान, पंजाबकडून हरप्रीत ब्रारने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर रवी बिश्नोईने 2 विकेट्स घेतल्या. रिली मेरीडिथ, मोहम्मद शमी आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
“…तर महाराष्ट्र लवकरात लवकर कोविडच्या संकटावर मात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही”
वारंवार केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही,आपल्या सर्वांना एकत्र काम करावं लागेल- देवेंद्र फडणवीस
“राज्यातील शाळांना 1 मे पासून सुट्टी जारी”
राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय