आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल पुण्यात आले होते. यावेळी एका कार्यक्रमामध्ये बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.
हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांवर टीका करताना रावसाहेब दानवेंची जीभ घसरली, म्हणाले…
पंतप्रधानपदाची स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भाजपने करुन दाखवलं. देशाच्या पंतप्रधानपदाची स्वप्न पाहणाऱ्या पक्षालाही या महाराष्ट्रात 60 च्या वर आमदार निवडून आणता आले नाही, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला होता. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार साहेबांवर टीका करण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाने नेमलेल्या राज्याच्या अध्यक्षाला स्वतःच्या मतदार संघात आमदार होता आले नाही. पुरात वाहून आलेले पुण्याचे स्वयंघोषित दादा, असं ट्विट करत रूपाली पाटलांनी चंद्रकांत पाटलांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
खा.शरद पवार साहेबांच्या वर टीका करण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाने नेमलेल्या राज्याच्या अध्यक्षाला स्वतःच्या मतदार संघात आमदार होता आले नाही ; पुरात वाहून आलेले पुण्याचे स्वयंघोषित दादा
— Rupalipatilthombare (@Rupalispeak) December 20, 2021
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीची कबर महाराष्ट्र खोदल्याशिवाय राहणार नाही; भाजप नेत्याचा इशारा
‘..तर घरा-दारासकट सगळं सोडून जातो’; भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य
“राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?”