भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुणे न्यायालयाचा धक्का; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

0
164

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुणे न्यायालयाने निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्या प्रकरणी पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यावर 15 सप्टेंबरपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

अभिषेक हरिदास यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खोटी माहिती सादर केल्याचा आरोप करत त्याबाबतची तक्रार करत पुणे न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने हे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे.

दरम्यान, माझ्या विरुद्धातील तक्रार संपूर्णतः राजकीय सूडबुद्धीने केलेली तथ्यहीन तक्रार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“विरोधकांच्या राजकारणामुळे मुंबई पोलिसांचं नाव खराब होतंय”

नोकरी गमावलेल्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना अडकवत आहेत- नितेश राणे

“काॅंग्रसचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here