प्रिया बेर्डेंवर राष्ट्रवादीच्या ‘या’ विभागाची जबाबदारी!

0
209

मुंबई : स्वर्गीय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 7 जुलै रोजी प्रिया बेर्डे आपल्या मनगटावर राष्ट्रवादीचं घड्याळ बांधणार आहेत. पक्षाची सांस्कृतिक विभागाची काही जबाबदारी मी सांभाळणार आहे, असं प्रिया बेर्डे यांनीच जाहीर केलं आहे.

मी पक्षात प्रवेश करतेय म्हणजे राजकारणात मी उतरणार नाही. पक्षाची सांस्कृतिक विभागाची काही जबाबदारी मी सांभाळणार आहे. आता ती काय असेल कशी असेल याची घोषणा 7 जुलैला होईल, असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकार, रंगमंचावरच्या कामगाारांना मी मदत करत होते. यावेळी अनेक राजकीय मंडळींशी माझी ओळख होती. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजितदादांशी माझं बोलणं झालं. आणि मग पक्षात प्रवेश करायचं ठरलं, असं बेर्डे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘या’ कारणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने”

‘राजकारणातली नवी आणीबाणी; संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका

“पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण”

शरद पवार यांच्या सूचनांबाबत मुख्यमंत्र्यांनी ठरवावं- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here