मुंबई : पेट्रोल-डिझेलपाठोपाठ केंद्र सरकारने खतांच्या किंमतीतही वाढ केली. यावर भाजपच्या खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.
कोरोना महामारीच्या संकटात अन्नदात्या बळीराजावर दरवाढीचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये म्हणून तात्काळ उपाययोजना होणं आवश्यक आहे, असं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. प्रीतम मुंडे यांनी या संदर्भात मोदी तसेच केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहिलं आहे.
राज्यात कोरोनाचं संकट असतानाच केंद्र सरकारने खतांच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमती कमी करून बळीराजाला आधार देण्याची मागणी प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला प्राधान्य दिल्यामुळे खतांच्या किंमती कमी करण्यासंदर्भात देखील सकारात्मक पाऊल उचलले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या घडामोडी –
मोदी गुजरात दाैऱ्यावर तर फडणवीस कोकण दाैऱ्यावर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा- चित्रा वाघ
महाराष्ट्रासाठी पुढचे 10 दिवस महत्त्वाचे- आरोग्यमंत्री राजेश टोपे
पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे; ठाकरे सरकारचा निर्णय
“अनिल परब यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”