मुंबई : “लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नियमांची पायमल्ली करत अनिल परब यांनी शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम केलं. त्यामुळे त्यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी”, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
“7 मे 2021 रोजी तयार केलेल्या कागदपत्रांत ही जागा अजूनही शेतजमीन आहे. पण आज त्या जागेवर प्रत्यक्षात रिसॉर्ट आहे. कोणतीही परवानगी न घेता, सर्व नियमांची पायमल्ली करून लॉकडाऊनदरम्यान अनिल परब यांनी 10 महिन्यांत रिसॉर्टचं बांधकाम पूर्ण केलं. मी स्वत: 10 मे रोजी दापोलीला रिसॉर्टवर जाऊन हा घोटाळा उघड केला.”, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
दापोली-मुरुड समुद्रकिनाऱ्यावर अनल परब यांनी केलेल्या जमीन व्यवहाराची कागदपत्र देखील सादर केली असून त्यातल्या तरतुदींनुसार अनिल परब यांनी घोटाळा केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे.
दरम्यान, येत्या शुक्रवारी रत्नागिरीत जाऊन पोलीस तक्रार करणार असून सोमवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अनिल परब यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत हे मोदींनाही पटलं असेल”
चंद्रकांत पाटलांनी ज्योतिष सांगण्याचा नवा व्यवसाय उघडलाय, त्यामुळे…; संजय राऊतांचा टोला
राज्यात 1 जूननंतर लाॅकडाऊन वाढणार?, आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…