Home देश “आज अयोध्येच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ही’ घोषणा करावी”

“आज अयोध्येच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ही’ घोषणा करावी”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. असं असतानाच आता भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान मोदींनी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये मंचावरुनच राम सेतूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा करावी, अशी मागणी केली आहे.

“आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येमधील मंचावरुन राम सेतू हे राष्ट्रीय स्मारक असल्याची घोषणा करावी. हा सेतू स्थळे व अवशेष अधिनियमाअंतर्ग येणाऱ्या सर्व नियम आणि अटींची पूर्तता करतो. तसेच सर्वोच्च न्यायलायामध्ये मी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने 2015 साली सादर केलेल्या कागदपत्रांमध्येही असं नमूद करण्यात आलं होतं. यासंदर्भातील संस्कृती मंत्रलयाने दिलेली फाइल पंतप्रधानांच्या टेबलवर आहे,” असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी काही भाष्य करणार का याकडे सर्व देशाचे लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“निकाल राम मंदिराच्या बाजूने दिला ते गोगोई आणि बाबरी उद्ध्वस्त करणारी शिवसेना कुठेच नाही”

बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार; अयोध्येतील सोहळ्याआधी ओवेसींचं ट्विट

आज बाळासाहेब हवे होते; राम मंदिर भूमिपूजनाआधी राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

Tik-Tok अमेरिकेला विका, नाहीतर; डोनाल्ड ट्रम्प यांचा चिनी कंपनीला इशारा