मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी एक महत्त्वाची घोषणा केली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली आहे. त्यांच्या या निर्णयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये याविषयी पंतप्रधानांना योजनेस मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. यामध्ये तांदूळ आणि चणा डाळ देण्यात येत असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सुमारे 7 कोटी लोकांना याचा लाभ होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते.
दरम्यान, गेल्या तीन महिन्यात गरीबांना मोफत अन्नधान्य देण्यात आलं होतं. 5 किलो गहू किंवा तांदूळ, 1 किलो डाळ आणि 1 किलो चणे असं धान्य मोफत दिलं. अशाच प्रकारे नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत आपण गरीबांना धान्य मोफत देणार आहोत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर उदयनराजेंच भाष्य; म्हणाले…
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरकडे रवाना”
पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप; नमो अॅपबद्दल केली मोठी मागणी