Home पुणे युतीबद्दल पंतप्रधान मोदी-अमित शहा यांच्याशी चर्चा करून सांगते- अमृता फडणवीस

युतीबद्दल पंतप्रधान मोदी-अमित शहा यांच्याशी चर्चा करून सांगते- अमृता फडणवीस

पुणे : महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या अमृता फडणवीस यांनी युतीबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुमकुवत असून, ते केंव्हा पडेल याचा नेम नाही. हे सरकार पडावं असा ध्यास प्रत्येकाला लागला आहे. जर हे सरकार पडलं, तर भाजपा चांगला पर्याय देईल, असं विधान अमृता फडणवीस यांनी केलं. पुण्यात आयोजित केलेल्या एका हातमागावरील वस्तूंच्या महोत्सवाचं उद्धाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

दरम्यान, हाच मुद्दा समोर घेत माध्यमांनी, भाजपा चांगला पर्याय देऊ शकते असं आपण म्हणता, पण भाजपा नेमकं कुणाला सोबत घेणार?’, असा प्रश्न अमृता फडणवीसांना विचारला. यावर अमृता फडणवीस यांनी, मी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून तुम्हाला निश्चित सांगेल, असं उत्तर दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

“डॉ.अमोल कोल्हे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट; चर्चांना उधाण”

अमृता वहिणींनी पुण्यावर नाही, तर गाण्यावर काम करावं; रूपाली चाकणकरांचा टोला

“41 वर्षानंतरचा वनवास आज संपला..’वेल डन बॉईज’; चित्रा वाघ यांच्याकडून भारतीय हाॅकी संघाचं काैतुक”

“अमृता फडणवीसांना काही काम नाही, त्यामुळे भाजपनं त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करावी”