आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी घेणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय 3 महिन्यात घेण्यात यावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी केली होती. मात्र, 3 महिने उलटून गेल्यानंतरही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्याबाबत निर्णय घेतला नाही. आता अशातच राहुल नार्वेकर यांनी याबाबत एक मोठं विधान केलं आहे.
ही बातमी पण वाचा : “ठाकरेंच्या ताकदीत वाढ; ‘या’ मोठ्या नेत्याची पुन्हा घरवापसी”
विधानसभा अध्यक्ष अपात्रतेसंदर्भात असो किंवा अन्य महत्वाचे विषय असो त्यावर निर्णय घेताना ज्युडिशियल अधिकारी म्हणून काम करत असतात. त्याचे मला पूर्ण भान आहे. त्यामुळे यासंदर्भात अधिक चर्चा करणार नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.
दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी कधी तर मी तुम्हाला आश्वासित करतो की यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही. योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरे, यांच्यासोबत जे केलं, तेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत…; अजित पवारांचं मोठं विधान
मोठी बातमी! खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी
“बच्चू कडूंनी भर सभेत सांगितलं, गुपीत, म्हणाले, फडणवीसांच्या सांगण्यावरून…”