Home महत्वाच्या बातम्या ‘…तर भाजपसोबत युती करायला तयार आहोत’; प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

‘…तर भाजपसोबत युती करायला तयार आहोत’; प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

2415

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लातूर : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. अशातच आता भाजप जर मनुस्मृतीचा त्याग करत असेल तर आम्ही भाजपशीही युती करायला तयार आहोत. असं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

भारतात कोणीही कुणाचा शत्रू नाही. सर्वच भारतीय आहेत. फार फार तर टोकाचे मतभेद असू शकतात. पण भाजपने आमची अट मान्य केली तर त्यांच्याशीही घरोबा होऊ शकतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; बारामतीतील राष्ट्रवादीच्या असंख्य नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश

भाजपला कमी लेखू नका. भाजप भांडणं लावण्यात आणि भांडणं लावण्यात कोणत्याही थराला जाईल. त्यांचा हा फंडा आहे. आपण सरळसरळ जिंकत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा त्यांची एक पॉलिसी आहे. ती म्हणजे भांडणं लावा, असं सांगतानाच लोकशाही वाचवायची असेल, हुकूमशाही येण्यापासून थांबवायची असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

स्वतःच्या सोयीनुसार बोलणं ही भाजपची भूमिका; पदवीधर निवडणुकीवरून ठाकरे गटाचा निशाणा

पठाण चित्रपटासोबतच, मराठी चित्रपटांचेही शो लोवा, नाहीतर…; मनसेचा धमकीवजा इशारा

आंबेडकरांना महाविकास आघाडीचा भाग व्हायचा असेल तर…; संजय राऊतांचा, प्रकाश आंबेडकरांना सल्ला