मोठी बातमी! प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
196

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अशातच आता अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेत शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नवीन संसद भवनातील पहिला दिवस ऊर्जा देणारा होता. राज्यसभेच्या सभागृहाची इमारत आश्चर्यकारक आहे. हा क्षण शरद पवारांबरोबर साजरा करता आल्याने तो आणखीनच खास बनला. यावेळी कॅफेटेरियामध्ये मित्रांबरोबर स्नॅक्स आणि सौहार्दाचा आनंद घेता आला. हा दिवस खरोखरच अविस्मरणीय आहे, असं ट्विटरवर लिहिलेल्या पोस्टमध्ये प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

दरम्यान, भेटीबाबतचे फोटो प्रफुल्ल पटेल यांनी ‘एक्स’ अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

गोपीचंद पडळकर म्हणाले, अजित पवार लबाड लांडग्याचं पिल्लू, आता रोहित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

 “सांगलीत, रविवारी मराठा क्रांती मोर्चाची हाक, आदर्शवत मोर्चासाठी बैठकांचा जोर”

“रिलायन्स ज्वेल्स सशस्त्र दरोड्याप्रकरणी, पहिल्या आरोपीला पकडण्यात सांगली पोलिसांना यश, ओडिसातून आरोपीला ठोकल्या बेड्या”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here