Home महाराष्ट्र सत्ता विश्वासघाताने मिळवता येते, पण…; भाजपची शिवसेनेवर टीका

सत्ता विश्वासघाताने मिळवता येते, पण…; भाजपची शिवसेनेवर टीका

मुंबई : शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस आली. या नोटीशीवरून शिवसेना-भाजपात राजकारण रंगलं आहे. भाजपाकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असून, त्यामुळे दबाव आणला जात असल्याचा आरोप, संजय राऊत यांनी केला होता. त्याला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“सत्ता विश्वासघाताने मिळवता येते, पण चालवायला क्षमता लागते. क्षमता नसली ती सरकार पाडणार, सरकार पाडणार, सरकार पाडणार अशी टेप सारखी लावली जाते, असं म्हणत केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

सत्तेवर आहात तर जनहिताची कामे करा. गोरगरिबांना पॅकेज नाही. शेतकऱ्यांना मदत नाही. सरकार पाडणारची टेप बंद करून या प्रश्नांवर काही कृती करा, असंही केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आपला तो ‘बाब्या’, दुसऱ्याचा तो ‘कारटा’; निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

एवढी का तणतण करत आहेत?; आशिष शेलारांचा संजय राऊतांना टोला

“शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?”

राष्ट्रवादी युवक अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, अजूनही अटक का नाही?;- चित्रा वाघ