दिल्ली : IPL मधला हाय वोल्टेज समजला जाणारा मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आज सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ४ विकेट्सने विजय मिळवला आहे.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 218 धावा करत मुंबई समोर विजयासाठी 219 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.
मुंबईकडून रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकने चांगली सुरुवात केली होती. त्यांनी आक्रमक खेळताना 7 षटकातच 70 धावा धावफलकावर लावल्या होत्या. मात्र त्यांची 71 धावांची भागीदारी शार्दुल ठाकूरने 8 व्या षटकातो तोडली. त्याने रोहितला 35 धावांवर बाद केले.
रोहित शर्माच्या पाठोपाठ 9 व्या षटकात रवींद्र जडेजाने सूर्यकुमार यादवला केवळ 3 धावांवर बाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला. तर 10 व्या षटकात मोईन अलीने आपल्याच गोलंदाजीवर क्विंटन डी कॉकला 38 धावांवर झेलबाद करत मुंबईला तिसरा धक्का दिला. यानंतर कायरन पोलार्डने वादळी खेळी केली. त्याने कृणाल पंड्याला साथीला घेत मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. त्या दोघांनी 89 धावांची भागीदारी केली. पण अखेर ही भागीदारी सॅम करनने कृणालला बाद करत तोडली.
कृणालने 32 धावा केल्या. त्यानंतर हार्दिकही करनच्या गोलंदाजीवर 19 व्या षटकात 7 चेंडूत 16 धावा करुन बाद झाला. अखेर पोलार्डने नाबाद 87 धावा केल्या आणि मुंबईला विजय मिळवून दिला.
दरम्यान, मुंबईकडून पोलार्डने सर्वाधिक 2विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 1विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
“राज्यातील पहिल्या महिला कंडक्टर सुनंदा कुंभार यांचं कोरोनामुळं निधन”
IPL-21! मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही; नाना पटोलेंचा हल्लाबोल
…तर मी गिरीश भाऊंचा भर चौकामध्ये सत्कार करीन- गुलाबराव पाटील