“पुन्हा राजकीय भूकंप?; मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या शिंदे गटाची ‘या’ आमदाराची, मिलिंद नार्वेकरांशी भेट, चर्चांना उधाण”

0
566

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राजकारणात कधी, काय घडेल? याचा नेम नसतो. मागच्यावर्षी शिवसेनेत बंड झालं. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. हे चित्र पाहिल्यानंतर राजकारणात कधी, काय घडेल, याचा नेम नाहीय.

मागच्या अधिवेशनात विरोधी बाकावर बसणारे आता सत्ताधारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी जोरदार चर्चा सुरु होती.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या काही आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु असताना, त्यांनी तसे दावे सुद्धा केले होते. पण मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही. त्यामुळे या आमदारांच्या पदरी प्रतिक्षाच आली.

ही बातमी पण वाचा : “बंडानंतर, पहिल्यांदाच, उद्धव ठाकरेंनी, घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण”

मंत्रिपदाच्या शर्यतीत शिवसेनेकडून आघाडीवर असलेलं नाव म्हणजे भरत गोगावले. ते महाडचे शिवसेना आमदार आहेत. भरत गोगावले यांना मंत्रिपदाबरोबर रायगडच पालक मंत्री पद हवं आहे. त्यांनी, आपल्याला मंत्रिपद मिळणार असे संकेत सुद्धा दिले होते. मात्र अजून ते वेट अँड वॉचवर आहेत.

आज विधिमंडळ परिसरात भरत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. राजन साळवी, भरत गोगावले आणि मिलिंद नार्वेकर एकत्र बोलत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडिओची, महिला आयोगाकडून दखल, रूपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

कथित आक्षेपार्ह व्हिडिओ लीक प्रकरणावर, आता किरीट सोमय्यांच नवं ट्विट चर्चेत, म्हणाले…

किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here