आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : चार दिवसांपूर्वी सांगली येथील सांगली मिरज रोडवरील रिलायन्स या सोन्या-चांदीच्या शोरूम वर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता.
या दरोड्यात चोरांनी 14 कोटी रूपयांचे दागिने, तर 67 हजारांची रोख रोकड लंपास केली होती. या दरोडे केलेल्या चार संशयित चोरांची रेखाचित्रे सांगली पोलिसांकडून जारी करण्यात आली आहेत. या रेखाचित्रातील संशयितांची माहिती कोणाला असेल, तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधवा. तसेच त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असं पोलिस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव यांनी यावेळी सांगितलं.
ही बातमी पण वाचा : “शरद पवारांनी धर्मांतर करून मुस्लिम व्हावं”
दरम्यान, शनिवारी एका व्यक्तीने रिलायन्स ज्वेलर्सची रेखी केल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालंं आहे. तसेच दरोड्यात वापरण्यात आलेली कारची मुंबईजवळून तर दुचाकीची गुलबर्ग्यातून खरेदी करण्यात आल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
“तुम्हाला सरकार चालवता येत नसेल तर पायउतार व्हा”
कधी कधी वाटतं, औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार; निलेश राणेंची टीका