Home महाराष्ट्र “महाराष्ट्राच्या पोलिसांनी पण ह्यातून काही शिकलं पाहिजे”

“महाराष्ट्राच्या पोलिसांनी पण ह्यातून काही शिकलं पाहिजे”

मुंबई : हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना एन्काउंटरमध्ये पोलिसांनी ठार केलं आहे. यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी मत व्यक्त केलं आहे.

ह्याला म्हणतात न्याय अश्या हरामखोरांना भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजे. महाराष्ट्राच्या पोलिसांनी पण ह्यातून काही शिकलं पाहिजे, कोपर्डीची घटना पण अशीच होती पण ते हरामी आजही सरकारचं खातायत. सगळ्याच बलात्काराच्या केसेस मध्ये हीच शिक्षा झाली पाहिजे,  अश्या अशयाचं ट्वीट करत निलेश राणे यांनी हैद्राबाद पोलिसांच कौतुक केलं आहे.

कायद्याची प्रक्रिया पूर्ण करुन चौकात फाशी दिली असती तर लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असती. न्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक आहे, असं मत नवाब मलिक यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, एन्काऊंटनंतर हैद्राबाद पोलिसांवर देशभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. तसचं अनेक नेत्यांनीही तेलंगणा सरकार आणि हैद्राबाद पोलिसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

न्याय झालाय पण ही पद्धत अन्यायकारक- नवाब मलिक

भारतानं टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

मानवधिकार आयोग करणार हैदराबाद एन्काऊंटरची सखोल चौकशी

“उत्तर प्रदेश, दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून काही शिकायला हवं”