Home पुणे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुराव घोलप महाविद्यालयात काव्यवाचन...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुराव घोलप महाविद्यालयात काव्यवाचन स्पर्धा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण  मंडळाच्या बाबुरावजी घोलप  महाविद्यालयात मराठी विभाग, इंग्रजी विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शरद पवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून  काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन यांनी केले

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीस शाळेत जात होते, तेंव्हा भाजपचे दोनच खासदार होते; नवाब मलिकांचा टोला

सध्याच्या धावपळीच्या युगात ताणतणावातून मुक्ती मिळविण्यासाठी विविध प्रकारचे छंद जोपा.  काव्यलेखन, गायन, अभिनय, वाचन, लेखन, नृत्य  यासारख्या छंदातून सकारात्मक ऊर्जा मिळते. महाविद्यालयात राबविण्यात येणारे विविध उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना संधी, असं प्राचार्य डॉ. नितीन म्हणाले आहेत.

दरम्यान, या काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. संगीता घोडके व प्रा. सुवर्ण  खोडदे यांनी काम केले. या स्पर्धेचे विजेते प्रथम क्रमांक अनुष्का राखपसरे (एफ वाय बी सी एस) द्वितीय क्रमांक सुनिता राठोड (एस वाय बी एस सी) तृतीय क्रमांक प्रणव कुंभार (एम. ए.) उत्तेजनार्थ क्रमांक सृष्टी मठपती (एस वाय बीएस्सी) या स्पर्धेचे आयोजन डॉ. माया माईनकर, डॉ. विजय बालघरे यांनी केले होते. याप्रसंगी  प्रा. सोनल बाविस्कर, प्रा. भास्कर घोडके, प्रा. संतोष सास्तुरकर उपस्थित होते. या स्पर्धेत चाळीस नवोदित कवींनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विजय बालघरे यांनी केले.

महत्वाच्या घडामोडी –

एसटीला फायद्यात आणण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितला ‘हा’ महत्वपूर्ण उपाय; म्हणाले…

“महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच चमत्कार 2024 ला दिल्लीत होणार”

“मोठी बातमी! संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा, भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप”