Home महाराष्ट्र पंतप्रधान मोदींचा पेट्रोल पंपावर फोटो; अजित पवारांची खास शैलीत टीका, म्हणाले…

पंतप्रधान मोदींचा पेट्रोल पंपावर फोटो; अजित पवारांची खास शैलीत टीका, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : देशात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच नागरिकांकडून मोदी सरकारवर सातत्याने टीका होते. पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्याचे बंधनकारक करण्यात आलं आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई, राजीव गांधी असे अनेक पंतप्रधान आपण पाहिले. या सर्वांनी उत्तम काम केलं. आता पंतप्रधान मोदी आहेत. मात्र मोदींनी सध्या कोणाचाही पेट्रोल पंप असो, तिथं आपला स्वत:चा फोटा लावणे बंधनकारक केलं आहे.

पेट्रोल 100 च्या पुढे गेले की पेट्रोल भरताना मोदींच्या फोटोकडे पाहायचे. मग ते फोटोतून तुम्हाला म्हणतील, ‘कशी तुझी जिरवली, भर आता 100 चं पेट्रोल!’ असं म्हणत अजित पवार यांनी मोदींवर टीका केली. पवारांनी मोदींवर केलेल्या उपहासात्मक टीकेवर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

महत्वाच्या घडामोडी –

मोदीजी, अमेरिकेतून माझ्यासाठी काहीतरी शाॅपिंग करा- राखी सावंत

लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना आणि आघाडी सरकारला; नवनीत राणा यांचा घणाघात

प्रतिष्ठा राज्यस्तरीय प्रशासन रत्न पुरस्कार चेअरमन राजेंद्र कांबळे, तर समाजसेवारत्न पुरस्कार अरुण बावधनकर यांना देण्यात आला

अखेर ठरलं! राज्यातील थिएटर्स ‘या’ तारखेपासून होणार सूरू; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय”