नवी दिल्ली : देशात करोनाचा फैलाव वाढत असल्याने 3 मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला यावेळी ही घोषणा केली आहे.
करोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेलं नाही. त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
करोनापासून होणारं नुकसान खूपच कमी ठेवण्यात भारताला यश मिळालं आहे. शिस्तबद्ध रितीनं भारतीयांनी कर्तव्याचं पालन केलं आहे. अनेकांना खूप त्रास भोगावा लागला. एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रत्येकजण कर्तव्य निभावत आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करा- अजित पवार
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का?- किरीट सोमय्या
“महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान झालं आहे”
राज्य सरकारचा मोठा निर्णय; नववी, अकरावीच्या परीक्षा आणि दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द