Home महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय; नववी, अकरावीच्या परीक्षा आणि दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द

राज्य सरकारचा मोठा निर्णय; नववी, अकरावीच्या परीक्षा आणि दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि  लॉकडाऊन वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर एसएससीचा इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेला दहावीचा भूगोलचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली. नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. आधीचे सरासरी मार्क लक्षात घेत संबंधित विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत. त्यानुसार नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दहावी आणि बारावीला प्रवेश मिळेल.

दरम्यान, शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुढील इयत्तेत वर्णी लागली होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“सीएसआर फंड हा कायदा काँग्रेस सरकारने तयार केला आहे, काही लोकांना फक्त राजकारण करायचंय”

…तर तुमचा कणखरपणा दिसला असता; राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

…तर सरकारला प्रश्न जरूर विचारणार; निलेश राणेंच मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र

“चंद्रकांतदादा, सगळा देश सध्या कोरोना विरोधात लढाई लढतोय… अन् तुम्हाला राजकारण सुचतंय”