Home महाराष्ट्र “महाजॉब्स योजना महाविकास आघाडी सरकारची की, शिवसेना-राष्ट्रवीदीची?”; ‘या’ काँग्रेस नेत्याचा सवाल

“महाजॉब्स योजना महाविकास आघाडी सरकारची की, शिवसेना-राष्ट्रवीदीची?”; ‘या’ काँग्रेस नेत्याचा सवाल

मुंबई : राज्य सरकारनं सुरू केलेल्या महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेस नाराज झाली आहे. महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्याच फोटोंना स्थान देण्यात आल्यानं, “ही योजना महाविकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीची?,” असा सवाल युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचं गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे,” असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सत्तेत सहभागी झालेला काँग्रेस पक्ष नाराज असल्याच्या चर्चेनं फेर धरला होता. मात्र, त्यावर पडदा पडला. ही चर्चा थांबत नाही, तोच महाविकास आघाडीतील काँग्रेसनं पुन्हा एकदा इतर दोन्ही पक्षांवर नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाचे शेतकऱ्यांना मिळाले अनोखे गिफ्ट

कोकणचं अजून किती नुकसान करणार हे सरकार?; नितेश राणेंचा सवाल

आयुक्त बदलून पाहिले; आता पालकमंत्री बदलून पाहा- मनसेचा इशारा

मला कोरोना झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात भरती करा; देवेंद्र फडणवीसांचा ‘या’ नेत्याला फोन