Home बीड “धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाचे शेतकऱ्यांना मिळाले अनोखे गिफ्ट”

“धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाचे शेतकऱ्यांना मिळाले अनोखे गिफ्ट”

बीड : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढदिवसाचे स्पेशल गिफ्ट दिले आहे.

पीकविमा योजनेच्या अंमलबजावणी बाबत अधिकृतरित्या शासन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020 पुढील तीन वर्षांसाठी पीकविमा संरक्षण देण्यात आले आहे. 3 वर्षांसाठीचा प्रश्न धनंजय मुंडे यांनी एकदाच सोडवला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2020 साठी कोणतीही कंपनी निविदा प्रक्रिया मध्ये सहभागी होण्यास तयार नव्हती. धनंजय मुंडे हे सातत्याने प्रयत्न करत होते. शेवटी त्यांनी ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांना जिल्ह्याचा पीकविमा स्वीकारण्यासाठी भाग पाडले आहे.

दरम्यान, केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना हक्काच्या विम्यापासून वंचित राहावे लागले. पण धनंजय मुंडेंमुळे आता बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना हा लाभ होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

कोकणचं अजून किती नुकसान करणार हे सरकार?; नितेश राणेंचा सवाल

आयुक्त बदलून पाहिले; आता पालकमंत्री बदलून पाहा- मनसेचा इशारा

मला कोरोना झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात भरती करा; देवेंद्र फडणवीसांचा ‘या’ नेत्याला फोन

नया है वह’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले..