आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
पेट्रोल, डिझेलचे दरवाढ आपल्या भल्यासाठीच होत आहे, असा उपरोधक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला लगावला. एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास अहवालाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
हे ही वाचा : राणेंच्या बालेकिल्यात शिवसेनेचं वर्चस्व; सिंधुदुर्गमध्ये इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश
सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा टक्का घसरतोय हे केंद्राच्याही लक्षात आलं आहे. म्हणूनच त्यांनी इंधनाचे दर वाढवायला सुरुवात केली आहे. आपण टीका करतो की, पेट्रोल एवढं वाढलं, डिझेलचे भाव तेवढे झाले. तसं नाहीये. हे आपल्या भल्यासाठीच होतंय, असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्राला लगावला.
दरम्यान, मी काही बोललो तर टीकात्मक किंवा उपहासात्मक बोलतो असं म्हणता. पण मी खरं की खोटं बोलतो हे तुम्ही सांगा. इंधन परवडेनासं झालं तर तुम्ही म्हणतात तसं प्रवासी तुमच्या बाजूने येतील की नाही? म्हणून चांगल्या हेतूने सरकार इंधन दरवाढ होत आहे. पण आपण लक्षातच घेत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“एका महिलेशी बोलताना भाषा कशी वापरली पाहिजे पवार साहेबांनी शिकवलं नाही का?”
“एका महिलेची बदनामी होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का?”