Home महाराष्ट्र “…तर जनता तुम्हाला गाजर दाखवल्याशिवाय राहणार नाही”

“…तर जनता तुम्हाला गाजर दाखवल्याशिवाय राहणार नाही”

सोलापूर : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी काल अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर ठाकरे गटाकडून विरोध केला जात आहे.

अर्थसंकल्पाविरोधात ठाकरे गटातर्फे सोलापुरात गाजर दाखवा आंदोलन करण्यात आले. शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान आहे की, तुमचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असेल तर उद्याच्या उद्या राज्यातील निवडणुका लावा. तुम्ही निवडणुका लावल्या की जनता तुम्हाला गाजर दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हान ठाकरे गटाच्या पदाधिकारीआणि कार्यकर्त्यांनी यावेळी दिलं.

हे ही वाचा : “IPL 2023! कॅप्टन कूल महेंद्रसिगं धोनी IPL मधून रिटायर….”

सोलापूरमध्ये शिंदे आणि भाजप सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात गाजर वाटप आंदोलन करण्यात आले. शिंदे-फडणवीस सरकारने बजेटमध्ये केवळ गाजर दाखवण्याचे काम केले आहे. त्यामुळे आम्ही गाजर आंदोलन केले आहे, असं ठाकरे गटाच्या पदाधिकारीआणि कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा आणि जनतेच्या हातात गाजर देणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय वानकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण शहरप्रमुख विष्णू कारमपुरी यांनी केली.

महत्त्वाच्या घडामोडी –

आम्ही उद्धव ठाकरेंचा आदर करतो, मात्र आदित्य ठाकरे…; शिंदे गटाचा जोरदार हल्लाबोल

“…तर भाजप, मनसेशी हातमिळवणी करण्यास तयार; ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ”

“येणाऱ्या काळात सगळ्या महापालिकेंवर मनसेची सत्ता असणार म्हणजे असणारच”