सातारा : महाराष्ट्रातील सरकार स्थिर असून भाजपमधूनच सरकार अस्थिर आणि राष्ट्रपती राजवटीच्या बातम्या सोडल्या जात आहे. भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे
भाजपमधील अनेक माणस ही सत्तेसाठी हपापलेली आहे. त्यांना सत्तेत परत यायचं आहे. म्हणून त्यांनी या बातम्या सोडलेल्या आहेत. तसं काहीही सुरु नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे, ते कराडमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारला रोख पैसे ओतावे लागतील. लोकांना विश्वासात घेऊन पैसे खर्च करावे लागतील. मात्र ही मानसिकता सरकारची दिसत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल असा विश्वास वाटत नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“नारायण राणेंच शिवसेनेशी जुनं नातं, ते सेनेमुळेच मोठे झालेआणि सेने मुळेच रस्त्यावरही आले”
जितेंद्र आव्हाडांचा भाजपाला चिमटा; म्हणाले…
राहुल गांधींच आजचं विधान स्वतःच्या जबाबदारीपासून पळणारं आहे- देवेंद्र फडणवीस
“केंद्र सरकारने राज्स सरकारला आत्तापर्यंत केली ‘इतक्या’ हजार कोटींची मदत”