मुंबई : राज्यात शुक्रवार 15 जानेवारी रोजी 34 जिल्ह्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल काल सोमवारी जाहीर करण्यात आला. ज्यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर लोक नाराज असून जनतेची नाराजी निकालातून दिसल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलं. यावर शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी जिंकलेल्या ग्रामपंचायती पाहता भाजपची सूज लोकांनी उतरवली असल्याचं स्पष्ट दिसत आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला जनमताचा अजिबात पाठिंबा नाही. ठाकरे सरकार म्हणजे जुगाड आहे, ते तोडजोडीतून बनले आहे, असं महाराष्ट्रातील विरोधी पक्ष गेले वर्षभर म्हणत आहे. परंतु त्या विरोधी पक्षाची हवा ग्रामपंचायत निवडणुकीत निघाली असल्याचं म्हणत शिवसेनेनं विरोधी पक्षाला टोला लगावला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“मी सुद्धा खासदार आहे, असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे”
“भाजप नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा आपला पराभव स्वीकारावा”
रिषभ पंतची मॅच विनिंग खेळी; भारताची ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी मात, भारताने मालिका जिंकली