Home महाराष्ट्र इथं माणसं मरत आहेत, तुम्ही मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?- नारायण राणे

इथं माणसं मरत आहेत, तुम्ही मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?- नारायण राणे

मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली. यावर भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज्यातील जनता समाधान होणार आहे का? त्यामुळे त्यांचं पालनपोषण होणार आहे का? दीड हजारात लोकांचं पोट कसं भरणार?, असा प्रश्न नारायण राणेंनी यावेळी उपस्थित केला. तसेच राज्यातील कामगार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील कोरोना बळींची वाढती संख्या हे उद्धव ठाकरे सरकारचं पाप आणि अपयश आहे, असा हल्लाबोल नारायण राणेंनी यावेळी केला.

तुम्ही हे वाचलात का?

ताईसाहेब! मोदींना एखादं पत्र लिहिलं तर बरं होईल; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर

दरम्यान, राज्याला स्वत:साठी लागणारा पैसा निर्माण करण्याचा अधिकार घटनेने दिलाय. त्यामुळे जरा संविधान वाचा. मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय राहता? इथं माणसं मरत आहेत. 60 हजार लोकं मेली आहेत. राज्य दिवाळखोरीकडे जात आहे. 1500 रुपये जाहीर करण्याचं काम क्लार्कचं आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय देता?, असा उपरोधक सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी –

“ज्यांनी राज्यातल्या घराघरात भांडणं लावली, त्यांच्याच घरात आता टोकाची भांडणं आहेत”

“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यावर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप”

बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहितीये त्यामुळे…; पंकजा मुंडेचा धनंजय मुंडेवर अप्रत्यक्ष निशाणा