पाटील म्हणाले, माझी जीभ घसरली, आता नवाब मलिक म्हणतात…

0
541

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यानं राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पाटील यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. अशातच चंद्रकांत पाटील यांनी काही क्षण आपली जीभ घसरल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केलीय. यावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावलाय.

हे ही वाचा : राज ठाकरे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?; ‘या’ दिवशी मुंबईत होणार मेळावा

ठीक आहे चंद्रकांत पाटील यांनी चूक मान्य केली. त्यांची जीभ घसरली होती, आता पाय घसरला जाऊ नये याची काळजी घ्यावी, असं नवाब मलिक म्हणाले.

शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. त्यामुळे त्यांचा एकेरी उल्लेख करण्याचा प्रश्नच नाही. एका कार्यक्रमात अनावधानाने तो उल्लेख झाला, असं सांगतानाच त्या दिवशी एका क्षणापूरती माझी जीभ घसरली होती, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय.

महत्वाच्या घडामोडी –

हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर नरेंद्र मोदींचं अस्तित्व कधीच संपलं असतं- भास्कर जाधव

“भोरमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार, 50 कार्यकर्त्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

शरद पवारांविषयी बोलताना जरासं भान बाळगा; निलेश लंके चंद्रकांत पाटलांवर भडकले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here