Home महाराष्ट्र राज ठाकरे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?; ‘या’ दिवशी मुंबईत होणार मेळावा

राज ठाकरे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?; ‘या’ दिवशी मुंबईत होणार मेळावा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत केव्हाही निघण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेचा मेळावा होणार आहे. त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा : हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर नरेंद्र मोदींचं अस्तित्व कधीच संपलं असतं- भास्कर जाधव

23 तारखेला मुंबईत मनसेचा मेळावा आहे त्यात तुमची देखील काही उत्तर मिळतील. राज ठाकरे मेळाव्यात काय बोलतील हे माहीत नाही. पण ते आपली भूमिका जाहीर करतील आणि बऱ्याचशा गोष्टी या क्लिअर होतील, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे येत्या 23 तारखेला होणाऱ्या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“भोरमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार, 50 कार्यकर्त्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

शरद पवारांविषयी बोलताना जरासं भान बाळगा; निलेश लंके चंद्रकांत पाटलांवर भडकले

भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेते प्रवेश करणार; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा