पैठण – पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर भेग; पंकजा मुंडे लिहिणार नितीन गडकरींना पत्र

0
433

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग- 752 चे काम पूर्ण होण्याच्या आधीच या रस्त्याला भेगा पडल्या आहेत. याबाबत  भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजप नेत्या पंकजा मुंडे पत्र लिहिणार आहेत. अशी माहिती पंकजा मुंडेंनीच दिली आहे.

पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग- 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहे. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांना पत्र लिहीनच.  त्यांनाही हे अजिबात चालणार नाही. तत्काळ दखल घेतली जाईल…’, असं ट्विट पंकजा मुंडेंनी केलं आहे.

दरम्यान, या संदर्भात उल्लेखनीय आहे की, मागील महिन्यात नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वाशीम जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रा.मा.क्र.753 सी नागपूर ते औरंगाबाद महामार्गाच्या दुरुस्तीचे काम बंद पाडल्याची तक्रार केली होती. यावरून बराच वाद निर्माण झाला होता.

महत्वाच्या घडामोडी –

मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण मला अधिक आवडतो- प्रीतम मुंडे

किरीट सोमय्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“आधी पोलिसांशी बाचाबाची, तरीही किरीट सोमय्या निघाले कोल्हापूरला जाण्यासाठी”

कोंबडं कितीही झाकलं तरी…; किरीट सोमय्यांना आलेल्या नोटीसवरून प्रवीण दरेकर आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here