“आमचा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा, हात लावाल तर राख व्हाल”

0
176

मुंबई : 2022 साली मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महापालिकेत अडकलेला आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला होता. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

आमचा भगवा शुद्ध आहे. महाराष्ट्रातील जनतेला आमच्या भगव्याची माहिती आहे. कोणीही आमच्या भगव्याविषयी बोलू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा आहे. हात लावाल, तर राख व्हाल, असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

तुम्हाला भगवा फडकवायचा असेल तर बेळगावमध्ये फडकवा, पाकव्याप्त काश्मीरमध्ये फडकवा. आमचं हिंदुत्वसुद्धा आहे. कोणी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. वेळ आल्यास आम्ही आमची हिंदुत्वाची भूमिका मांडू., असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

24 तारखेला ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा 21 फुटांचा पुतळा जाळणार”

एकनाथ खडसे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; रूग्णालयातून दिला डिस्चार्ज

“शेतकऱ्यांनी थकबाकीची रक्कम भरली तर 50 टक्के वीजबिल माफी मिळणार”

“भाजप हा हवेत चालणारा पक्ष असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हा झोपेत चालणारा पक्ष आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here