आमचा पैठणचा बोका हा खोक्यावर जाणारा नाही, याची आम्हांला…; भर सभेत मुख्यमंत्र्यांसमोर रावसाहेब दानवेंचं विधान

0
406

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथे भव्य सभा पार पडली. या बैठकीला भाजप नेते तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील उपस्थित होते. या भाषणात बोलताना दानवेंनी शिंदे गटातील आमदारांवर खाऊन खाऊन माजलेत बोके, पन्नास खोके, पन्नास खोके` या विरोधकांच्या घोषणेचा संदर्भ देत एक विधान केलं.

आमचा पैठणचा बोका खोक्यावर जाणारा नाही, याची आम्हाला खात्री असल्याचं दानवे म्हणाले. विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर खोके घेऊन गद्दारी केल्याचा आरोप केला जातो. पण मंत्री संदीपान भुमरे यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय पैठण मतदारसंघातील लोकांना आवडलेला आहे. आजच्या सभेला जमलेली गर्दी ही त्याचीच पावती आहे. आपला पैठणचा बोक्या खोक्यांवर विकला जाणार नाही, याची आम्हाला खात्री असल्याचं दानवे म्हणाले.

हे ही वाचा : “राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, आगामी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी मनसे-शिंदे गट युती होणार?”

दरम्यान, रावसाहेब दानवेंच्या या विधानानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवत दानवेंच्या या विधानाला दाद दिली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

नाना पटोलेच काही दिवसांनी भाजपमध्ये येतील, मात्र आम्ही…; नितीन गडकरींना आलेल्या ऑफरवर भाजपचं प्रत्युत्तर

शिंदे गट- शिवसेनेचा वाद; मनसेची प्रतिक्रिया

शिंदे सरकारला मोठा धक्का ; ‘या’ कारणांमुळे झाला तब्बल 12 हजार कोटींचा दंड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here