मुंबई : राज्य सेवा आयोगाच्या 2019 मधील परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या 413 उमेदवारांना तातडीने नियुक्ती पत्र देण्यात यावीत, अशी मागणी विधानपरिषदेचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या उमेदावारांची अद्यापही नियुक्ती झालेली नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. या सर्वांना आठ दिवसांच्या आतमध्ये नियुक्ती पत्रकं द्यावीत अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने मंत्रालयासमोर आंदोलन करु, असा इशाराच पडळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या भावना महत्वाच्या होत्या. मी कार्यकर्ता म्हणून सहभागी झालो होतो. काही दिवसांपूर्वी मला काही विद्यार्थ्यांचा फोन आला की पत्रकार भवनाच्या इथे आम्ही आंदोलन करणार आहे आणि पत्रकार परिषद घेणार आहोत. मात्र इथे आल्यावर मला कळलं की पोलिसांनी या विद्यार्थ्यांना या ठिकाणी थांबू दिलं नाही. पोलिसांनी दडपशाही केली,” असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“काँग्रेस सर्वांत भ्रष्ट पक्ष, तुम्ही भाजपला मत द्या”
राष्ट्रवादी-काँग्रेसने मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार नाही अशीच खबरदारी घेतली- चंद्रकांत पाटील
“मराठी भाषेत स्टेट्स ठेवलं म्हणून तिघांना कर्नाटक पोलिसांनी केली अटक”
बाॅलिवूडकरांवर कोरोनाचं सावट! बॉलिवूडचे आणखी 2 मोठे कलाकार कोरोनाच्या विळख्यात!