Home देश “मराठी भाषेत स्टेट्स ठेवलं म्हणून तिघांना कर्नाटक पोलिसांनी केली अटक”

“मराठी भाषेत स्टेट्स ठेवलं म्हणून तिघांना कर्नाटक पोलिसांनी केली अटक”

बेळगाव : मोबाईलवर मराठी स्टेटस ठेवल्यामुळे बेळगावमध्ये 3 मराठी मुलांना अटक करण्यात आली आहे. कर्नाटक ग्रामीण पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली असून या धक्कादायक प्रकारामुळे कर्नाटक पोलिसांवर टीका केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार निखिल केसरकर, विशाल छप्रे, दिगंबर डेळेकर या तिघांनी त्यांच्या मोबाईलवर मराठी भाषेत स्टेटस ठेवले होते. फक्त मराठी स्टेटस ठेवल्याचे कारण देत बेळगाव ग्रामीण पोलिसांनी या तिन्ही तरुणांना अटक केलीय.

एकीकडे कन्नड रक्षण वेदिलेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर मराठी पाट्यांना काळे फासण्याची घटना मागील काही दिवसांपूर्वी घडली. यावेळी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पोलिसांनी कन्नड कार्यकर्त्यांना पकडले नाही, असा आरोप होतोय. मात्र, आज मराठी मुलांनी फक्त मराठी स्टेटस ठेवले म्हणून त्यांना पोलिसांनी अटक केली.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे येथील स्थानिक मराठी संघटना आणि तरुणांमध्ये संतापाची तीव्र भावना असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

बाॅलिवूडकरांवर कोरोनाचं सावट! बॉलिवूडचे आणखी 2 मोठे कलाकार कोरोनाच्या विळख्यात!

“राष्ट्रवादी-काँग्रेसने मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार नाही अशीच खबरदारी घेतली”

“…दुभत्या म्हशी च्या लाथा गोड”; अतुल भातखळकरांचा शिवसेनेला टोला

…मग डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका- संजय राऊत