‘…तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही’; राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा

0
328

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अभिनेते किरण माने यांनी भाजप विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना मुलगी झाली हो या मालिकेमधून काढण्यात आलं. यावर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवला आहे.

अभिनेते किरण माने यांनी भाजप विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना मुलगी झाली हो या मालिकेमधून काढले आहे. अशा झुंडशाही विरोधात आवाज उठवला गेला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. असं प्रखर मत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मांडलं आहे.

हे ही वाचा : …तर मी आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेन; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य

शरद पोंक्षे,आरोही वेलणकर, कंगना राणावत, अनुपम खेर, यांच्या सारखे कलाकार उघड-उघड भाजप समर्थनार्थ आपले मत मांडत असतात, अशा वेळी त्यांना चित्रपट किंवा नाटकातून काढण्यात येत नाही. याउलट त्यांना पद्मश्री व एफ टी आय सारखी मोठी मोठी लाभाची पदे देऊन सन्मानित केले जातं, असं बाबासाहेब पाटील म्हणाले आहेत.

दिल्लीतील शेतकरी आंदोलन किंवा इतर सामाजिक आंदोलनावर भाष्य केल्यानंतर किरण माने सारख्या एका हरहुन्नरी कलाकाराबद्दल अशा प्रकारचे कृत्य केले जाते हे खरच अशोभनीय काम आहे. कारण या देशात प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि अशा परिस्थितीत त्यांनी काय बोलावं काय लिहावा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, अशा वेळी कुठल्याही चैनल किंवा कुठल्याही कंपनीला कलाकारांच्या वैयक्तिक जीवनतील मतप्रवाहचे राजकारण करून एखाद्या कलाकाराची उपजीविका हिरावून घेणे ही बाब अन्याय करणारी व अशोभनीय तसेच निंदनीय सुध्दा आहे, असंही बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“देवेंद्र फडणवीस हे आमचे कुटुंब प्रमुख, आमचे दैवत, त्यांच्यावर नाराज होऊ शकत नाही”

माझी दृष्टी तपासून घ्यायला, माझं नेतृत्व समर्थ आहे, त्यांनी माझी काही काळजी करू नये; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

“शिवसेना नेते गुलाबराव पाटील कोरोना पाॅझिटिव्ह; ट्विट करत दिली माहिती”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here