मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून राज्यातील जनतेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे.
केरळ व महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. करोनाच्या नव्या उद्रेकामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आताही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखणे, मास्कचा वापर करणे यांसारखी सावधानी न पाळल्यास करोना पुन्हा येईल, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
दरम्यान, प्रत्येकाने चांगल्या सवयी लावून घेतल्यास करोनाचा पराभव निश्चित आहे, असंही भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“उद्धवजींचे सरकार ना रामाचं…ना भिमाचं…नाही काही कामाचं”
दिशा बरोबर झालं आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर…- करुणा शर्मा
“तुम लाख कोशिश करो मुझे हराने की, जब जब मैं बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से निखरा हूँ”
तुम्ही तेव्हाच आमच्याशी लव्ह मॅरेज केलं असतं तर राज्यात युतीची सत्ता असती; गुलाबराव पाटलांचा टोला