Home महाराष्ट्र “महाराष्ट्रातलं सध्याचं सरकार आपण घालवू या फाजील विश्वासावर विरोधी पक्ष जगतोय”

“महाराष्ट्रातलं सध्याचं सरकार आपण घालवू या फाजील विश्वासावर विरोधी पक्ष जगतोय”

मुंबई : विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्त्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रखडवल्या आहेत. यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून भगतसिंह कोश्यारी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

राज्यपालांनी 12 सदस्यांची फाईल मंजूर न करणं यामागे राजकारण आहे आणि फाईल दाबून ठेवा, असा वरचा हुकूम आहे. तसंच महाराष्ट्रातलं सध्याचं सरकार आपण घालवू या फाजील विश्वासावर विरोधी पक्ष जगत आहे, पण हा विश्वास म्हणजे ‘ऑक्सिजन’ नसून कार्बन डाय ऑक्साईड आहे. विषारी वायू आहे. या खटपटीत गुदमरून तडफडाल हा धोक्याचा इशारा आम्ही देत आहोत, असा हल्लाबोल सामनातून केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र पुरोगामी, संयमी आहे म्हणजे तो भेकड आहे असं मानू नये. ज्येष्ठांचा व पाहुण्यांचा आदर करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण ‘भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणू काठी’ हेसुद्धा आमचे संतसज्जन आम्हाला सांगून गेले आहेत, असंही सामनात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

कोकणात वादळ चार तास थांबलं पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन तासही थांबले नाहीत- प्रवीण दरेकर

“ज्या शिवसेनेला कोकणाने भरभरून बळ दिलं त्या शिवसेनेनं कोकणाला वाऱ्यावर सोडून दिलं”

गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा- नवाब मलिक

सांगली जिल्ह्यात लाॅकडाऊन वाढणार; पालकमंत्री जयंत पाटलांनी दिले संकेत