विरोधकांनी खोट्या तलवारीचे घाव घालू नये- संजय राऊत

0
305

नवी दिल्ली : विरोधकांनी राज्य सरकारविरोधात घाव घालावा, ते त्यांचं कामच आहे. पण त्यांनी खोट्या तलवारीचे घाव घालू नये, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी भाजपला दिला आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून मंत्र्यांना अडचणीत आणून सरकार हलवू शकतो असं केंद्र सरकारला वाटत असेल तर ते कदापी शक्य नाही. अशा तपास यंत्रणेंचा आघाडी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही., असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, विरोधक असले तरी ते महाराष्ट्रातील आहेत. आपण एकमेकांना ओळखतो. त्यामुळे खोटे आरोप करणं बरं नाही, असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“अजित पवार आता तुम्हाला कोणी वाचू शकत नाही, तुम्ही जेवढी मस्ती केली ती या आयुष्यातच भरावी लागणार”

“महाराष्ट्रात सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटलांचं मानसिक संतुलन ढासळलंय”

अजित पवारांची सीबीआय चौकशी करा- चंद्रकांत पाटील

“त्यांच्याकडे केंद्राची सत्ता असेल तर आमच्याकडे महाविकास आघाडी सरकार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here