मुंबई : भविष्यात मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमधून गर्दी कमी करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या मतावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून नितीन गडकरींना टोले लगावण्यात आले आहेत.
केंद्राने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड अशा राज्यांकडे आणि दिल्लीसारख्या शहरांकडे जास्त लक्ष दिले तरी मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल, असं सामना अग्रलेखात म्हटलं गेलं आहे.
मुंबई-पुण्यावर आदळणारी गर्दी कमी करण्यासाठी केंद्राने इतर राज्यांमध्ये रोजगार व पायाभूत सुविधा उभ्या केल्या तर गडकरींची चिंता दूर होईल, असं सामनामधून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये सध्या कोरोना मोठ्या प्रमाणात आहे, त्याचं कारण म्हणजे तेथील दाट लोकसंख्या आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यातील लोकसंख्या कमी करावी याचा मार्ग गडकरी यांनी सांगायला हवा, असंही सामना मधून सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
कोणाच्या धमकीला मी घाबरत नाही; चंद्रकांत पाटलांचं हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर
“रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड”
…अन्यथा राज्यात पुन्हा कडक लॉकडाउन करावा लागेल; मुख्यमंत्र्यांचा इशारा
30 जूननंतर लॉकडाउन उठणार का; उद्धव ठाकरेंनी दिलं ‘हे’ उत्तर