Home महाराष्ट्र …तरच राज्यात सत्ताबदल होऊ शकतं; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

…तरच राज्यात सत्ताबदल होऊ शकतं; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

मुंबई : भाजप आणि शिवसेना एकत्र आले किंवा राष्ट्रवादी भाजपसोबत गेली तरच राज्यात सत्ता बदल होऊ शकतो, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

आमदार फुटण्याची किंवा फोडण्याची स्थिती आज तरी मला दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले आहेत., असंही रामदास आठवले यांनी यावेळी म्हटलं. ते लोकमतशी बोलत होते.

दरम्यान, महाराष्ट्रात भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येतील का? असा प्रश्न रामदास आठवलेंना यावेळी विचारण्यात आला. यावर रामदास आठवले यांनी, याचं उत्तर फक्त उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडवणीस हे दोघेच देऊ शकतील, असं म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

मोहन भागवत कुठले डॅाक्टर आहेत ते तपासावे लागेल; नाना पटोलेंचा टोला

अनिल देशमुखांबाबतची भूमिका राष्ट्रवादीने स्पष्ट करावी- केशव उपाध्ये

ठाण्यात ‘या’ पोस्टरची चर्चा; राष्ट्रवादी काँग्रेसने मानले पंतप्रधानांचे आभार

‘मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही?’; संजय राऊतांची भाजपवर टीका