“राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचं सावट?; आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत दिली अपडेट, नवी नियमावली जाहीर”

0
305

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका संभावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच आता राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोरोनाबाबत अपडेट दिली आहे.

संपुर्ण राज्यात आता कोरोनाचे फक्त 132 सक्रीय रुग्ण आहेत. तसेच ॲाक्सिजन आणि इतर अत्यावश्यक साहित्य तपासून घेण्याचे आदेश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासी जे येतील त्यांचे थर्मल टेस्टींग केले जाणार आहे., अशी माहिती तानाजी सावंत यांनी यावेळी दिली. तसेच विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे रॅन्डीमली थर्मल स्क्रिनिंग केले जाईल. त्यामळे प्रिकॅाशनरी डोस घ्यावा, अशी सुचना आहे, असं तानाजी सावंत म्हणाले.

हे ही वाचा : चंद्रकांत पाटलांनी प्रचार केलेल्या गावात राष्ट्रवादीने मारली बाजी

राज्य टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाईल. टास्क फोर्स जुनी आहे. डॅाक्टर यांच्या अध्यक्षते खाली ही टास्क फोर्स असेल, असंही तानाजी सावंत यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात अजून कोरोनाचा नवीन BF7 व्हेरियंटचा एकही रूग्ण आढळलेला नाही. त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही, असं तानाजी सावंत म्हणाले. तसेच लहान मुले व वृद्ध नागरिकांनी शक्यतो मास्क वापरावा, असं आवाहनही तानाजी सावंत यांनी यावेळी केलं. त्यांनी केले.

विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे रॅन्डीमली थर्मल स्क्रिनिंग केले जाईल. त्यामळे प्रिकॅाशनरी डोस घ्यावा, अशी सुचना आहे. यंत्रणा पुर्णपणे सजग आहे. संपुर्ण राज्यात आता कोरोनाचे फक्त 132 सक्रीय रुग्ण आहेत. तसेच ॲाक्सिजन आणि इतर अत्यावश्यक साहित्य तपासून घेण्याचे आदेश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासी जे येतील त्यांचे थर्मल टेस्टींग केले जाणार आहे.

आयएमएची नवीन मार्गदर्शिका –

1. प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे.

2. साबणाने हात धुवा, सॅनिटायझर वापरा.

3. सामाजिक अंतर पाळण्यास पाळा.

4. सार्वजनिक मेळावा टाळा.

5. शक्य असल्यास आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा.

6. सर्दी, खोकला, सर्दी यांसारख्या लक्षणांसाठी चाचणी घ्या.

7. लग्न समारंभ, मेळावा पुढे ढकलण्यात यावा.

महत्त्वाच्या घडामोडी –

ठाकरे गटाला आणखी एक झटका; ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

…तर आधी राजीनामा द्या, मग…; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिली तंबी

“धक्कादायक! औक्षण करत असताना उडाला भडका, सांगलीत नवनिर्वाचित सरपंच थेट रूग्णालयात,”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here