आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ‘इंडिया टुडे’ आणि ‘सी व्होटर’ने ‘मूड ऑफ द नेशन’ या आधारवर एक सर्व्हे केला आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशातील टॉपच्या मुख्यमंत्र्यांमध्ये स्थान मिळालं आहे. या यादीत उद्धव ठाकरे चौथ्या क्रमांकावर आहे. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
गेल्या सव्वा दोन वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदाही मंत्रालयात आले नाहीत. त्यांच्यासाठी महाराष्ट्र फक्त मुंबईत आहे. मग कशाच्या निकषावर ते पाच टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये आले?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
हे ही वाचा : मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना आमने-सामने; भाजप नगरसेवकांनी केलं दालनाबाहेरच 6 तास आंदोलन
कोणत्या निकषावर ते पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आले? कारण गेली सव्वा दोन वर्ष ते एकदाही मंत्रालयात आले नाहीत. ते लोकांसठी गेल्या 80-90 दिवसांपासून उपलब्ध नाहीत. पंतप्रधानांनी बोलावलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीला ते उपस्थित नसतात आणि महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. कारण त्यांचा महाराष्ट्र फक्त मुंबई आहे. मुंबईबाहेर त्यांना महाराष्ट्र माहीत नाही अशा वेळी त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो? असा सवाल करतानाच त्यांना क्रमांक मिळावा असेच निकष असतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
अपक्षांच्या पाठिंब्यामुळे मंडणगड नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता
मोठी बातमी! उद्धव ठाकरे पुन्हा टॉप 5 मुख्यमंत्र्यांच्या यादीत