Home महाराष्ट्र एकीकडे पवार माझे बाप म्हणायचं आणि दुसरीकडे…; रुपाली चाकणकरांची चित्रा वाघ यांच्यावर...

एकीकडे पवार माझे बाप म्हणायचं आणि दुसरीकडे…; रुपाली चाकणकरांची चित्रा वाघ यांच्यावर टीका

मुंबई : महाराष्ट्रात महिला मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी कठोर पावले उचलत घटनांची तात्काळ दखल घ्याल ह्या अपेक्षांसह मन:पूर्वक शुभेच्छा, अशा शब्दात नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना चित्रा वाघ यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावरुन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधलाय.

राजकीय उदरनिर्वाहासाठी बेताल वक्तव्य करणाऱ्या काही लोकांना नवीन वसुलीमंत्री कोण याची काळजी लागली होती. एकीकडे मी पवार साहेबांच्या तालमीत वाढले, ते माझे बाप आहेत म्हणायचं आणि दुसरीकडे असं अशोभनीय वक्तव्य करायचा दुटप्पीपणा कसा जमत असेल?, असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे .

कर्तव्यनिष्ठ ही दिलीपराव वळसे पाटीलसाहेबांची ओळख आहे. कारवाई होऊ नये म्हणून पक्ष बदलणाऱ्या लाचखोरांनी जरी त्यांना आज शुभेच्छा दिल्या असल्या तरी ते अशा गुन्हेगारांना सोडणार नाहीत. गृहमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

राजकीय उदरनिर्वाहासाठी बेताल वक्तव्य करणाऱ्या काही लोकांना नवीन वसुलीमंत्री कोण याची काळजी लागली होती. एकीकडे मी पवार…

Posted by Rupali Chakankar on Tuesday, 6 April 2021

महत्वाच्या घडामोडी –

जिल्हा परिषद शाळेमधल्या हा मुलाने केलेला डान्स होतोय व्हायरल; पहा व्हिडिओ

लॅाकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा जनतेतून उद्रेक होईल- उदयनराजे भोसले

मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला मोठा धक्का; विधानसभेच्या उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

मोठी बातमी! MPSC परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार