आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलनं सध्या महाराष्ट्रभर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गौतमीच्या आडनावावरून सध्या महाराष्ट्रात जोरदार खडाजंगी सूरू आहे.
गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा थेट इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी दिला आहे. यामुळे गाैतमीच्या आडनावावरून नवा वादाला तोंड फुटलं आहे. यावरून आता खुद्द गाैतमी पाटीलनं माैन सोडलं आहे.
ही बातमी पण वाचा : उपमुख्यमंत्री फेकण्यात तज्ज्ञ आहेत; नाना पटोलेंची टीका
‘माझं नाव पाटिल आहे, मी पाटील नाव लावणार ना आता कोण काय बोलतोय मला फरक पडत नाही …माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे., असं गाैतमी म्हणाली. दरम्यान, आज विरार मध्ये पहिल्यांदाच गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गौतमीनं श्री सत्यनारायणाचे दर्शन घेतलं आणि त्यानंतर तिनं पत्रकारांशी संवाद साधला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“अजित पवारांनंतर, आता भावी मुख्यमंत्री म्हणून, नाना पटोले बॅनरबाजीवर झळकले, चर्चांना उधाण”
“मोठी बातमी! भाजप नेते आशिष शेलारांनी घेतली, शरद पवारांची भेट, तर्कवितर्कांना उधाण”