आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
या निधनाची बातमी समजताच अनेक राजकीय नेते तसेच कलाकारांनी त्यांना आदरांजली वाहली. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर, त्यानंतर स्टुडिओतील कर्मचाऱ्यांनी ही बाब पोलिसांना सांगितली. त्यानंतर नितीन देसाई यांच्यावर तब्बल २४९ कोटींचं कर्ज असल्याची बाब समोर आली. त्यामुळे कर्जबाजारीमुळे देसाई यांनी आत्महत्या केली असल्याची चर्चा सूरू आहे. अशातच आता यासंदर्भात आता मनसेचे रायगड अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी एक मोठा दावा केला आहे.
ही बातमी पण वाचा : नितीन देसाईंच्या आत्महत्येबाबत, त्यांच्या बाॅडीगार्डने केला मोठा खुलासा, म्हणाला…
. गेल्या अनेक दिवसांपासून ते जरा अस्वस्थ होते. अनेक बाबींवर ते चर्चा करायचे. आर्थिक अडचणी वगैरे तर होत्याच. पण त्यांच्याच कला क्षेत्रातून काही नामांकित व्यक्तींकडून एन. डी. स्टुडिओला शूटिंग येऊ दिल्या जात नव्हत्या. ते हे सगळं माझ्याशी बोलायचे. पण या सगळ्या गोष्टी फार क्लेशदायक आहेत”, असं जितेंद्र पाटील म्हणाले.
खरंतर खूप दिवसांपासून एन. डी. स्टुडिओकडे येणाऱ्या शुटिंग रद्द केल्या जायच्या. त्या कोण रद्द करायचं? निर्माते-दिग्दर्शकांवर कोण दबाव टाकायचं? हा मोठा प्रश्न आहे. इतका मोठा स्टुडिओ चालवताना त्यांना शूटिंगची कामं मिळणं महत्त्वाचं होतं. पण ते येणं कुणामुळे बंद झालं हा संशोधनाचा विषय आहे”, असं जितेंद्र पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘या’ माजी राज्यमंत्र्याची संभाजी भिडे यांना थेट जीवे मारण्याची धमकी
“मोठी बातमी! संभाजी भिडेंचा खून करणार; माजी राज्यमंत्र्यांचा इशारा, फडणवीसांना लिहिलं पत्र”