आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. मात्र या दौऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अरे गधड्या तुझी सावरकरांवर बोलायची लायकी तरी आहे का? सावरकर कोण होते ते माहिती तरी आहे का? त्यांना कुठे ठेवलं होतं ते काय करत होते? काय हालअपेष्ठा सहन केल्या?, असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी केला. मुंबईतील नेस्को सेंटर येथे मनसेचा आयोजित गटप्रमुखांच्या मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
हे ही वाचा : राज्यपाल पदावर बसलेत म्हणून मान राखतोय, नाहीतर…; राज ठाकरेंचा, भगतसिंग कोश्यारींवर हल्लाबोल
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी राहुल गांधींची नक्कलही केली. “फक्त महापुरुषांची बदनामी करणं चाललंय. त्यादिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते ना, गुळगुळीत मेंदूचे आहेत. हल्ली राहुल गांधी बोलतात की आर डी बर्मन बोलतात हेच कळत नाही, काय बोलतोय ते ऐकून तर घेऊ दे, अशी टीका राज ठाकरेंनी यावेळी राहुल गांधींवर केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
ब्रेकींग न्यूज! सावरकर प्रेमी शरद पोंक्षे यांनी घेतली शरद पवारांची भेट; तर्कवितर्कांना उधाण
आधी पद द्या, मगच प्रवेश करतो; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंना प्रस्ताव
रंगभूमीवरील ‘नटसम्राट’ हरपला ; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन