“अरे वेड्या, भाजप हा महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष, आम्हांला गाडण्याची भाषा करू नका”

0
391

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बारामतीत बोलताना भाजपवर निशाणा साधला होता.

आमच्या शक्तिपीठावर हल्ला करून काही तरी साध्य होईल, असे भाजपाच्या विचारधारेला वाटते. मात्र भाजपाला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा हल्लाबोल मुंडेंनी केला होता. यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : भाजपाचा मास्टरस्ट्रोक; ‘या’ नेत्याकडे नेतृत्व सोपवत दिला राष्ट्रवादीला धक्का

अरे वेड्या, भाजप महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे. आम्हाला गाडण्याची भाषा करू नका. दोनचार खासदार असणाऱ्या पक्षाच्या मंत्र्याने अशी भाषा वापरू नये, असा पलटवार फडणवीसांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. अक्कलकोट येथे फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचे आज भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.

एकीकडे शेतकरी आत्महत्या करतोय, एसटीचे कामगार संप करत आहेत. मात्र दुसरीकडे हे मंत्री नाचगाण्याचे कार्यक्रम करत आहेत, अशी टीका करतानाच अरे वेड्या, भाजप हा महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे. आम्हाला गाडण्याची भाषा करू नका. आमचा एक कार्यकर्ता तुमच्यासाठी पुष्कळ आहे, असा हल्लाबोल फडणवीसांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसे एसटी कामगारांसोबत; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा”

शिवसेना नेत्याच्या कार्यक्रमात भाजप आमदारांची हजेरी; चर्चांना उधाण

पंतप्रधान झालात तर पहिला निर्णय कोणता घ्याल?; राहुल गांधींनी सर्वांची मनं जिंकणारं दिलं उत्तर; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here