सोलापूर : मुस्लिम धर्मात अधिकृत तर हिंदू धर्मातील लोकांना अनधिकृत बायका असतात, असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. तसेच लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी चीनच्या धर्तीवर कुटुंब नियोजनचा कायदा करण्याची आवश्यकता आहे, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं. ते पंढरपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
देशाच्या हितासाठी समान नागरी कायदा आवश्यक आहे. मुस्लिम समाजाने या कायद्याविषयी उगाच बाऊ करण्याची गरज नाही. कोणत्याही एका धर्माच्या किंवा जातीच्या विरोधात हा कायदा नाही. समान नागरी कायद्यामुळे आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान, रामदास आठवलेंच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“आदित्य ठाकरेंना भेटलेला पुण्यातील अफगाण विद्यार्थी संकटात, तालिबानकडून कुटूंबाचा शोध सुरू”
गावात जातं आणि फुटाणे फेकत बसतं; रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तारांना टोला
… म्हणून चंद्रकांत पाटलांनी अधिकाऱ्यांना दिलं चॉकलेट
“…अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु”; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा