Home महाराष्ट्र “…अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु”; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

“…अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु”; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

सांगली : एमपीएससी आयोग धनगर आणि वंजारी समाजाला आरक्षणानुसार जागा देत नाही. त्यामुळे धनगर समाजातील मुलांवर अन्याय होत असल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे.  याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर  यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

MPSC आयोगामार्फत राज्यातील भरल्या जाणाऱ्या जागांमध्ये बिंदू नामावलीनुसार धनगर समाजाला 3.5 टक्के आरक्षित जागा द्या. बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा दिल्या नाहीत तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार, असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर  यांनी राज्य सरकारला दिलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रशासनावर वचक नाही. मुख्यमंत्री निकामी आणि प्रशासनही निकामी आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि समाज कल्याण विभागाचे मंत्री झोपा काढत आहेत का? असा खोचक सवाल गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

दरम्यान, 2020च्या एमपीएससी आणि पीएसआय पदांच्या भरतीत धनगर समाजाला अवघ्या तीन जागा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आयोगाने आरक्षणानुसार जागा भराव्यात, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा विद्यार्थ्यांनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्य सरकारने मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याची सवय आता बंद करावी”

भाजपच्या जन आशीर्वाद कोरोना नियमांचे उल्लंघन; चार गुन्हे दाखल

“देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं दिल्लीतील वजन वापरून, बैलगाडी शर्यतीचा प्रश्न मार्गी लावावा”

“मोठी बातमी! नारायण राणेंच्या जनआशिर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ वगळला, चर्चांना उधाण”